झारखंडच्या पलामूमध्ये मुसलमान समुदायाकडून हिंदूंना बेदम मारहाण करून त्यांची घरे उद्ध्वस्त !

पलामू जिल्ह्यातील मुरुमातू गावातील घरे अन् भूमी सोडून जातांना  हिंदु

पलामू (झारखंड) – झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील मुरुमातू गावाजवळ रहाणार्‍या ५० हून अधिक हिंदु कुटुंबांतील सदस्यांना मुसलमान समुदायाने मारहाण केली. त्यांची घरे उद्ध्वस्त केली आणि त्यांना घरे अन् भूमी सोडून जाण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. ही भूमी मदरशांच्या मालकीची असल्याचे मुसलमान समाजाचे म्हणणे आहे, तर हिंदु समाज येथे ४० वर्षांपासून रहात आहे. मुसलमानांनी हिंदु समुदायातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना चारचाकी गाड्यांमध्ये कोंबून जंगलात सोडून दिले.

पोलिसांची उदासीनता

मुरुमातू गावापासून पांडू पोलीस ठाणे केवळ ४ किलोमीटर अंतरावर होते; मात्र हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी एकही पोलीस घटनास्थळी आला नाही, असे वृत्त दैनिक ‘भास्कर’ने प्रसिद्ध केले आहे. (हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणारे पोलीस मुसलमानांच्या कथित समस्या सोडवण्यासाठी मात्र संवेदनशीलता दाखवतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) ‘हे संपूर्ण प्रकरण भूमीच्या वादाशी संबंधित आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे’, असे पांडू पोलीस ठाण्याचे अधिकारी धुमा किस्कू यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

झारखंडमध्ये ‘लँड जिहाद’ !