शासकीय कामानिमित्त ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणा !

वन विभागाकडून आदेश निर्गमित !

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, २६ ऑगस्ट (वार्ता.) – शासकीय कामानिमित्त जनता किंवा लोकप्रतिनिधी यांच्याशी दूरभाष किंवा भ्रमणभाष यांद्वारे संभाषण करतांना अभिवादन करतांना वन विभागाचे सर्व अधिकारी अन् कर्मचारी यांनी ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ या शब्दाचा वापर करावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. याविषयी २५ ऑगस्ट या दिवशी महसूल आणि वन विभाग आदेश काढण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयीचे आवाहन केले होते.

संपादकीय भूमिका 

राष्ट्रप्रेम वृद्धींगत करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला अभिनंदनीय निर्णय !