तिघा आय.ए.एस्. अधिकार्‍यांना १ मासाच्या कारावासची शिक्षा !

आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा परिणाम !

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करणे आणि समयमर्यादेत आदेशाचे पालन न करणे, या कारणांवरून तिघा आय.ए.एस्. अधिकार्‍यांना एक मासाच्या कारावासाची आणि २ सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यात राज्याचे विशेष मुख्य सचिव (कृषि) पूनम मालाकोंडैया, माजी विशेष कृषि आयुक्त एच्. अरुण कुमार आणि कुर्नुलचे माजी जिल्हाधिकारी जी. वीरापांडियन् यांचा समावेश आहे. न्यायालयाने सरकारला ऑक्टोबर २०१९ मध्ये ग्रामीण कृषि साहाय्यक पदावर एका उमेदवाराची नियुक्ती करण्याचा आदेश देत त्याचे २ आठवड्यांत पालन करण्यास सांगितले होते; मात्र न्यायालयाच्या या आदेशाचे पालन केले गेले नाही.

संपादकीय भूमिका

अशी चूक करणार्‍या प्रत्येक अधिकार्‍याला शिक्षा झाली पाहिजे !