‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’मध्ये सहभागी साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात आले. मागील लेखात आपण ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला समाजातून मिळालेला उदंड प्रतिसाद पाहिला. या लेखात आपण साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती पाहूया.

(भाग ८)

या लेखाचा मागील भाग येथे पहा : https://sanatanprabhat.org/marathi/532818.html

पू. रमानंद गौडा

सौ. रेवती हरगी, सागर, शिवमोग्गा.

केवळ चार जणांना संपर्क केल्यावर मोठ्या ग्रंथांची मागणी मिळणे आणि यांतून गुरुतत्त्व मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याचे लक्षात येणे अन् संकुचित राहून ध्येय ठेवल्याची जाणीव होणे : ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या सेवेसंदर्भात पू. रमानंद गौडा यांचे मार्गदर्शन ऐकल्यावर ‘हे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रांती करणारे अभियान आहे’, असे मला वाटत होते. ‘व्हॉटस्ॲप’वर ग्रंथांविषयीचे वेगवेगळे लिखाण येत होते. ते पाहून पुष्कळ आनंद मिळत होता.

पू. रमानंदअण्णा यांच्या मार्गदर्शनानंतर देवाने मला ६० जिज्ञासूंची नावे सुचवली. त्यानंतर या सेवेसाठी पुष्कळ प्रार्थनाही होत होत्या. या सेवेअंतर्गत ३०० मोठे आणि ५०० लहान ग्रंथ वितरित करण्याचे ध्येय ठेवले होते. केवळ ४ जिज्ञासूंना संपर्क केल्यानंतरच २९७ मोठ्या ग्रंथांची मागणी मिळाली. माझी ६० जणांच्या नावाची सूची होती; पण केवळ ४ जणांना संपर्क करूनच मी ठेवलेले ध्येय गुरुदेवांनी पूर्ण केले. यातून ‘गुरुतत्त्व किती मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे आणि मी किती संकुचिततेने ध्येय ठेवले होते’, याची मला जाणीव झाली अन् मी अधिक ध्येय ठेवण्यासाठी प्रयत्न केले.’

कु. नागमणी आचार, सागर, शिवमोग्गा.

एका अधिवक्त्यांनी ग्रंथ घेतल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावरील आनंदावरून त्यांना ग्रंथ अतिशय आवडल्याचे समजणे : एका अधिवक्त्यांना ग्रंथांची माहिती सांगितल्यावर त्यांनी ग्रंथांचा संच विकत घेतला. हे सर्व ग्रंथ त्यांना अतिशय आवडले आहेत, हे त्यांच्या तोंडवळ्यावरील आनंदावरून कळत होते. गुरुदेवांनी दिलेल्या या अनुभूतीसाठी कोटीशः कृतज्ञ आहे.’

सौ. उमा श्रीनाथ, कुशालनगर

उपाहारगृहामध्ये येणार्‍या पर्यटकांना ग्रंथांचे महत्त्व सांगून ग्रंथ हातात दिल्यावर ‘त्यांना ग्रंथ स्वतःशी बोलत आहेत’, असे वाटणे आणि अनेक जणांनी ग्रंथाची मागणी देणे : ‘आमचे उपाहारगृह आहे. त्यामुळे मी दिवसभर व्यस्त असते. मला बाहेर जाऊन सेवा करण्याची पुष्कळ इच्छा होती; परंतु मी बाहेर जाऊन अभियानाची सेवा करू शकत नव्हते. त्यामुळे माझी गुरुदेवांच्या चरणी ‘मी अभियानाची कशी सेवा करू ?’, अशी सतत प्रार्थना होत होती. त्यानंतर उपाहारगृहामध्ये येणार्‍या पर्यटकांना ग्रंथांचे महत्त्व सांगून मी त्यांच्या हातामध्ये ग्रंथ देत होते. ग्रंथ हातात घेऊन ‘हे ग्रंथ किती चांगले आहेत. पाहूनच पुष्कळ चांगले वाटते. ते ग्रंथ आमच्याशी बोलत आहेत, असे वाटते’, असे ते लोक सांगत होते. अनेक जणांनी ग्रंथांची मागणी दिली.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ७.१०.२०२१) (समाप्त)


‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’चे नियोजन करतांना पू. रमानंद गौडा यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१. सर्व वयोगटातील साधकांना अभियानात सहभागी करून त्यांचा उत्साह वाढवणे

‘ज्ञानशक्ती अभियानाच्या या सेवेपासून कुणीही वंचित राहू नये; म्हणून धर्मप्रचारकांनी उत्तरदायी साधक, प्रासंगिक साधक, युवा साधक आणि वयस्कर साधक अशा सर्व साधकांना उत्साह मिळावा’, यासाठी अभियानाविषयी मार्गदर्शन केले. त्यामुळे सर्वांचा उत्साह वाढला आणि साधकांनी ग्रंथ वितरणासाठी ध्येय ठेवून प्रयत्न केले.

२. साधकांना ‘हे सर्व ईश्वरी नियोजनच आहे आणि आपण केवळ माध्यम आहोत’, याची जाणीव होणे

बर्‍याच साधकांनी प्रथम सेवेचे ध्येय अल्प प्रमाणात ठेवले होते; परंतु ‘अभियान चालू झाल्यावर साधकांना येणार्‍या अनुभूती पाहून आणि मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून ‘हे सर्व ईश्वरी नियोजनच आहे आणि आपण केवळ माध्यम आहोत’, याची जाणीव झाली.

यांतून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा, संतांचे सुंदर नियोजन आणि ते करत असलेला साधकांचा विचार’, हे शिकायला मिळाले. असे गुण माझ्यामध्ये निर्माण होण्यासाठी माझे प्रयत्न होऊ दे, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना आहे.’

– कु. भव्या नाईक, शिवमोग्गा (७.१०.२०२१)

‘गुरुकार्यवृद्धी आणि साधकांची प्रगती व्हावी’, या निरंतर ध्यासामुळे पू. रमानंद गौडा साधकांसाठी अहोरात्र प्रयत्नरत असणे आणि अभियान भारतभर चालू झाल्यावर पू. अण्णांना पुष्कळ आनंद होऊन कृतज्ञता वाटणे

‘पू. रमानंद गौडा यांचा भाव, तळमळ, परिश्रम घेणे, गुरुकार्यवृद्धी आणि साधकांची प्रगती व्हावी’, या निरंतर ध्यासामुळे ते आम्हा सर्व साधकांसाठी अहोरात्र प्रयत्नरत असतात. त्यांना एकच ध्यास असतो, ‘सर्व साधक गुरुचरणांपर्यंत पोचायला हवेत. यासाठी कितीही कठीण परिश्रम घ्यावे लागले, तरी चालतील.’ पू. अण्णांना ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान पूर्ण भारतात व्हावे’, असे वाटत होते. हे अभियान भारतभर चालू झाल्यावर पू. अण्णांना पुष्कळ आनंद झाला. त्यामुळे त्यांची भावजागृती झाली आणि त्यांना ‘गुरूंचे ज्ञान आता सर्वांना मिळेल. साधकांची साधना होऊन गुरुकार्याची वृद्धी होईल’, यासाठी वारंवार कृतज्ञता वाटली.’ – कु. भव्या नाईक, शिवमोग्गा (७.१०.२०२१)