‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’मध्ये सहभागी साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात आले. मागील लेखात आपण ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला समाजातून मिळालेला उदंड प्रतिसाद पाहिला. या लेखात आपण साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती पाहूया. (भाग ८)

पू. रमानंद गौडा

सौ. भाग्या जगदीश, तुमकुरू

१. जिज्ञासूंनी स्वतः संपर्क करून यापुढील सर्व ते ‘ऑनलाईन’ सत्संगाला जोडणार असल्याचे सांगणे : ‘औद्योगिक क्षेत्रातील एका जिज्ञासूंची भेट झाली. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘मी सनातन धर्माविषयी माहिती शोधत होतो. मला हे हवे होते.’’ त्यांनी भ्रमणभाष करून आम्हाला भेटायला बोलावले. त्यांना साधनेविषयी सांगताच ते म्हणाले, ‘‘आम्ही घरातील सर्वजण आता साधना करतो.’’ त्यांनी लगेच ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’ ‘डाऊनलोड’ करून घेतले आणि म्हणाले, ‘‘यापुढे आम्ही तुमच्या सर्व ‘ऑनलाईन’ सत्संगाला जोडले जाऊ. आम्हाला वरचेवर भेटत रहा.’’

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर तुमकुरू येथील ‘अमोघ दूरचित्रवाणी’ वाहिनीकडून ‘सनातन ज्ञानशक्ती ग्रंथ अभियाना’च्या कार्यक्रमानिमित्त निःशुल्क अर्धा घंटा थेट प्रसारण होणे : तुमकुरू येथील ‘अमोघ दूरचित्रवाणी’ वाहिनीवर ‘सनातन ज्ञानशक्ती ग्रंथ अभियाना’च्या कार्यक्रमानिमित्त निःशुल्क अर्धा घंटा थेट प्रसारण करण्याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘निःशुल्क करणे जमणार नाही. तुम्ही प्रायोजक शोधा.’’ त्या वेळी मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘हे प्रसारकार्य तुमचेच आहे. तुम्हाला अपेक्षित अशी ही सेवा करवून घ्या.’ त्यानंतर अमोघ वाहिनीकडूनच मला भ्रमणभाष आला. ते म्हणाले, ‘‘अर्धा घंट्याचा ग्रंथ अभियानाचा कार्यक्रम करूया.’’ त्यानंतर त्यांनी कार्यक्रमाचे निःशुल्क थेट प्रक्षेपणही केले. यावरून गुरुदेवांनी ‘गुरुदेवांचे धर्मप्रसाराचे कार्य केवळ तेच करवून घेत आहेत. मी केवळ निमित्तमात्र आहे’, ही अनुभूती मला दिली. त्याविषयी गुरुचरणी कृतज्ञता अर्पण करते.’ (२४.९.२०२१)

सौ. कलावती, हासन

‘सनातन ज्ञानशक्ती ग्रंथ अभियाना’च्या संदर्भात ‘व्हॉटस्ॲप’ च्या माध्यमातून पाठवलेल्या ‘पोस्ट’ वरून (लिखाणावरून) सनातनच्या ग्रंथांचे २ संच आणि ४० ग्रंथांची मागणी मिळणे : ‘६ मासांपूर्वी ‘मल्नाड टेक्निकल सोसायटी’ या संस्थेला ‘त्यांच्या शाळा आणि महाविद्यालये यांच्या ग्रंथालयांसाठी ग्रंथ घ्यावेत’, यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारले होते; परंतु ते म्हणाले, ‘‘सध्या तुमचे ग्रंथ नकोत.’’ आता चालू असलेल्या ‘सनातन ज्ञानशक्ती ग्रंथ अभियाना’च्या संदर्भात त्या संस्थेच्या संचालकांना

केवळ ‘व्हॉटस्ॲप’च्या माध्यमातून एक ‘पोस्ट’ पाठवून त्याविषयी भ्रमणभाषवरच सविस्तर माहिती सांगितली. त्यावर त्यांनी सकारात्मकता दर्शवली आणि त्यांच्या सर्व शाळा अन् महाविद्यालये यांच्या प्राचार्यांना ती ‘पोस्ट’ पाठवून त्यांनी त्यांना हवे असलेले ग्रंथ विकत घेण्याची अनुमती दिली. त्यामुळे महाविद्यालयांनी स्वतःहून भ्रमणभाष करून ‘तुमच्या ग्रंथांसाठी मागणी आहे, तुम्ही या’, असे सांगून त्यांच्या संस्थेकडून ‘इंग्रजी १ आणि कन्नड १, असे ग्रंथांचे २ संच अन् महाविद्यालयांसाठी ४० ग्रंथ’, अशी मागणी दिली, तसेच एक जण कन्नड भाषेतील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदारही झाले आहेत. त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी १८ लघुग्रंथ विकत घेतले. या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प कसा कार्यरत असतो’, हे मला अनुभवायला मिळाले. ग्रंथ अभियानात कुठेही गेल्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. या सेवेतून चैतन्याची अनुभूती येणे आणि आनंद स्थिती अनुभवणे साध्य होत आहे.’ (२४.९.२०२१)

श्री. मुकुंद मोगेर, शिवमोग्गा

५० मोठे ग्रंथ आणि १५० लघुग्रंथ वितरण करण्याचे ध्येय ठेवणे, जिज्ञासूंची सूची काढून ग्रंथांची माहिती सांगितल्यावर त्यांनी लहान अन् मोठे दोन्ही ग्रंथांचा संच विकत घेणे आणि गुरुकृपेने सर्वांकडूनच उत्तम प्रतिसाद येणे : ‘गाडीवरून पडल्याने माझ्या हाताचा अस्थिभंग झाला होता. त्यामुळे मला बाहेर जाऊन सेवा करता येत नव्हती. घरी राहून सेवा कशी करणार ?’, या विचाराने मी ५० मोठे आणि १५० लघुग्रंथ वितरित करण्याचे ध्येय ठेवले. पू. रमानंदअण्णा यांचा सत्संग झाल्यावर जिज्ञासूंची एक सूची काढली आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून सेवा चालू केली. एका जिज्ञासूला सनातन संस्थेचा परिचय सांगून ग्रंथांची माहिती सांगितली. ग्रंथांची नावे ऐकूनच त्यांना अतिशय चांगले वाटले आणि त्यांनी पूर्ण ग्रंथांचा संच (११२ मोठे ग्रंथ, २८ छोटे ग्रंथ) घेतला. तेव्हा ‘हे सर्व गुरुकृपेनेच होत आहे’, असे वाटून कृतज्ञता वाटली. आता ज्या जिज्ञासूंना संपर्क करत आहे, त्या सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि लोक मागणीही करत आहेत.’

सौ. गीतांजली कडीवाल, हुबळी

पू. अण्णांनी सांगितलेल्या ‘एकतरी संपर्क करायचा’, या मार्गदर्शनानुसार शैक्षणिक संस्थे’च्या ट्रस्ट मध्ये संपर्क करून ग्रंथ आणि पंचांग यांचे वितरण करणे : ‘पू. रमानंदअण्णांनी मार्गदर्शनामध्ये सांगितले, ‘‘एक दिवस आपली सेवा झाली नाही, तर आपल्याला झोप यायला नको. इतकी आपली तळमळ हवी.’’ तेच विचार मनात येत होते. एक दिवस बाहेर सेवेला जाण्यासाठी जमले नाही. मी बहिणीच्या मुलीच्या दीड वर्षाच्या बाळाला सांभाळण्यासाठी घरी थांबले होते. मार्गदर्शनात

पू. अण्णांनी सांगितले त्यानुसार ‘एकतरी संपर्क करायचा’, असे मला वाटत होते. लगेचच मी एका शैक्षणिक संस्थेच्या ‘ट्रस्ट’मध्ये काम करणार्‍या व्यक्तीला भ्रमणभाष केला. त्यावर त्यांनी ‘ग्रंथ आणि पंचांग घेतो’, असे सांगून प्रत्यक्षातही १२५ ग्रंथ आणि १०० पंचांग घेतले.’

सौ. तारा शेट्टी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), बेळगाव

१. ‘ज्ञानशक्तीचे प्रसार करणे म्हणजे सनातन ज्ञानाचा प्रसार करणे’, हे पू. रमानंद गौडा यांनी या अभियानासाठी ठेवलेले नाव ऐकूनच भावजागृती होणे : ‘मी सेवेचे नियोजन करतांना वरवर नियोजन करत असल्याचे माझ्या लक्षात आले. ‘प्रत्येक लहान गोष्टींचा विचार करून नियोजन कसे करायचे ?’, हे सर्व ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या नियोजनाच्या निमित्ताने पू. रमानंदअण्णांनी शिकवले. या ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या नियोजनाचा आरंभ अभियानाचे नाव ठेवण्यापासून केली. गुरुदेवांचे ग्रंथ ही ज्ञानशक्ती आहे. ‘ज्ञानशक्तीचे प्रसार करणे म्हणजे सनातन ज्ञानाचा प्रसार करणे’, असे आहे. असे नाव पू. रमानंदअण्णांनी या अभियानासाठी ठेवले. ते नाव ऐकूनच माझी भावजागृती झाली.

२. अभियानाच्या सेवेतून नामजपादी उपाय होऊन सेवेविषयी पुष्कळ नवीन विचार येणे आणि सेवा चालू झाल्यापासून भावस्थिती अनुभवता येणे : मला पुष्कळ दिवसांपासून आध्यात्मिक त्रास होत होता; परंतु ग्रंथ अभियानाची सेवा करतांना माझ्यावर सतत नामजपादी उपाय होत असल्याचे जाणवले. या अभियानाच्या सेवेची संधी मिळाल्यावर सेवेविषयी आपोआपच पुष्कळ नवीन सूत्रे सुचून मला सतत भावस्थिती अनुभवता येत होती.

३. परात्पर गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोलतो, त्याप्रमाणे पू. रमानंदअण्णांशी बोलणे चालू होणे : अभियानाशी संबंधित सेवा चालू झाल्यापासून मानसपूजा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह पू. रमानंदअण्णांचे रूपही दिसत होते आणि परात्पर गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोलतो, तसे पू. अण्णांशी बोलणे चालू झाले.

‘संतांच्या माध्यमातून गुरुदेव प्रत्येक सेवेच्या माध्यमातून कसे पुढे घेऊन जातात ?’, हे अनुभवतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. अण्णा एकच आहेत’, असे वाटत होते.

पू. अण्णांच्या रूपात गुरुदेवच दिसत होते. ‘या सर्व सेवा देऊन ते आमचा उद्धार करवून घेत आहेत’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ (क्रमश: पुढच्या रविवारी)

(सर्व सूत्रांचा दिनांक ७.१०.२०२१)