देशात कधी चर्च, मशीद, बौद्ध विहार आदी अन्य धर्मियांची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त करण्याची धमकी जिहादी आतंकवादी देत नाहीत; कारण त्यांचे शत्रू हिंदू असून त्यांचा विनाश करून जिहाद्यांना भारताला इस्लामी राष्ट्र बनवायचे आहे. हिंदूंनी हे लक्षात घेऊन तत्पूर्वी भारतात हिंदु राष्ट्र स्थापावे ! – संपादक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील अलीगंज हनुमान मंदिर आणि मनकामेश्वर मंदिर यांच्यासहित शहरातील अन्य मंदिरे बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी देणार्या शकील नावाच्या जिहाद्याला पोलिसांनी अटक केली. तो देहलीतील सीलमपूर येथील रहाणारा आहे. आतंकवादविरोधी पथक त्याची चौकशी करत आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. ‘शकील याचे आतंकवादी संघटनांशी संबंध आहेत का ?’ याची माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी शकील याच्याकडून मंदिरांना उडवण्याची धमकी देणार्या पत्राची छायांकित प्रत हस्तगत केली आहे.