भारताचे परराष्ट्र संबंधित धोरण अधिक गतीने आणि शिस्तीने कार्यरत व्हायला हवे. चीनला नमवणे तसे अवघड नाही. चीनचे अनेक व्यापार व्हिएतनामकडे जात आहेत. चीन विश्वातील विविध तंत्रज्ञानाची चोरी करून त्याची नक्कल (कॉपी) करतो. त्याची गुणवत्ता चांगली नाही. व्हिएतनामच्या युद्धातून चीनला मैदानातून पळावे लागले आहे. प्रत्यक्षात चीनने युद्धे जिंकलेली नसल्यामुळे त्यांची शस्त्रे आणि विमाने युद्धात किती चालतील, हा प्रश्नच आहे. प्रत्यक्ष युद्धापेक्षा अन्य तंत्रज्ञान आणि साधने यांचा वापर चीनकडून होऊ शकतो.