नगर – येथील खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी देहलीहून रेमडेसिविर इंजेक्शन आणून वाटल्याच्या प्रकरणाला उच्च न्यायालयात वेगळे वळण लागले आहे. नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अहवालानुसार विखे पाटील हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअर कडून मिळालेल्या पैशातून जिल्हा शल्यचिकित्सकांनी १ सहस्र ७०० रेमडेसिविर इंजेक्शन पुण्यातील एका आस्थापनातून आणली. यावरील सविस्तर अहवाल न्यायालयाने ३ मे या दिवशी सादर करण्यास सांगितले आहे. तसेच शिर्डी विमानतळावरील १० एप्रिल ते २५ एप्रिल या काळातील सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मे दिवशी होणार आहे.