सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी

सिंधुदुर्ग – वयाची अट न घालता जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना सरसकट कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी. संचारबंदीच्या काळात ‘अधिस्वीकृती’धारक पत्रकारांना सूट देण्यात आली आहे; मात्र या पत्रकारांसह वृत्तपत्रांचे अन्य पत्रकार, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक प्रसारमाध्यमे (स्थानिक न्यूज चॅनेल) येथे काम करणार्‍या पत्रकारांनाही सूट देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा पत्रकारसंघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.