Burhanpur Tension : नागपूरनंतर आता बर्‍हाणपूर जाळणार होते धर्मांध मुसलमान !

  • इस्लामच्या विरुद्ध कथित आक्षेपार्ह टिपणी केल्याचे सांगत पोलीस ठाण्याला घातला घेराव !

  • पोलीस अधिकार्‍यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन अनर्थ टाळला !

बर्‍हाणपूर (मध्यप्रदेश) – महाराष्ट्रातील नागपूरनंतर आता मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरला हिंसाचाराच्या आगीत ढकलण्याचा कट उघडकीस झाला आहे. इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह टिपण्यांवरून बर्‍हाणपूरमध्ये तणाव निर्माण झाला. कोतवाली पोलीस ठाण्याला घेराव घालण्यासाठी धर्मांध मुसलमान मोठ्या संख्येने तेथे पोचले. मुसलमानांचा जमाव पाहून हिंदूंनी दुकाने बंद केली आणि तेथून पळ काढला. याविषयीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हर्ष सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारा वीर सिंह चौहान आणि पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार हे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी पोचले. त्यानंतर पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.

सध्या सुरक्षेच्या कारणास्तव बर्‍हाणपूरचा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. त्याचसमवेत सामाजिक माध्यमांवर वादग्रस्त टिपण्या करणार्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.

औरंगजेबाच्या थडग्याच्या वादावरून नुकताच महाराष्ट्रातील नागपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. या वेळी दंगलखोरांनी १२ दुचाकी, अनेक चारचाकी आणि एक जेसीबी पेटवले. या हिंसाचारात ३ पोलीस उपायुक्तांसह ३३ पोलीस घायाळ झाले होते.  या प्रकरणी पोलिसांनी ५० जणांना अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्माच्या विरुद्ध कुणीही आणि कितीही वेळा अत्यंत खालच्या थराला जाऊन टिपण्या केल्या, तरी न कधी कुठे जाळपोळ होते आणि न दंगल ! दुसरीकडे अल्पसंख्यांक मात्र त्यांच्या धर्माच्या विरुद्ध कथित टीका झाली, तरी ते त्वरित देशाची कायदा-सुव्यवस्था हातात घेतात आणि हिंदू, तसेच सरकारी व्यवस्थेला लक्ष्य करतात. यामुळे लोकशाहीने त्यांना दिलेले सर्व अधिकार आता काढून घेण्याचा कायदा झाला पाहिजे.