Delhi Judge Bungalow Cash Recovery Controversy : देहली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या निवासस्थानी सापडली रोकड

  • सरन्यायाधिशांनी न्यायमूर्तींचे केले स्थानांतर

  • न्यायमूर्तींची केली जाणार चौकशी

देहली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी होळीच्या दिवशी आग लागली. वर्मा यांचे कुटुंबीय त्या दिवशी घरात नव्हते. त्यांनी दूरभाषवरून अग्नीशमन दल आणि पोलीस यांना आग लागल्याची माहिती दिली. आग विझवल्यानंतर अग्नीशमन दलाला बंगल्यातील काही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली होती. ही माहिती समोर आल्यानंतर त्यांचे स्थानांतर करण्यात आले आहे.

खोल्यांमध्ये पैसे सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायवृदांची बैठक बोलावली आणि न्यायमूर्ती वर्मा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर २०२१ पर्यंत ते अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. तसेच न्यायमूर्ती वर्मा यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात महाभियोग कारवाई करण्यावरही चर्चा चालू असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायमूर्ती वर्मा यांना त्यागपत्र देण्यासही सांगितले जाऊ शकते, अशी माहिती मिळत आहे.