पी.एफ्.आय.कडून वर्ष १९२१ मध्ये मलाबार येथील हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी ‘साजरी’ !

पी.एफ्.आय.च्या मिरवणुकीत रा.स्व. संघाच्या गणवेशात दाखवलेल्या लोकांना बेड्या ठोकल्याचा प्रसंग !

  • हिंदूबहुल देशात हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी ‘साजरी’ केली जाणे हे हिंदूंना लज्जास्पद ! यातून पुढेही हिंदूंचा नरसंहार होऊ शकतो, हेच पी.एफ्.आय.कडून दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आतातरी केंद्र सरकार पी.एफ्.आय.वर बंदी घालणार का ?
  • केरळमध्ये हिंदुद्वेषी साम्यवाद्यांचे सरकार असल्याने हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी विनाअडथळा साजरी केली जात असेल, तर आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही !
पी.एफ्.आय.च्या मिरवणुकीत रा.स्व. संघाच्या गणवेशात दाखवलेल्या लोकांना बेड्या ठोकल्याचा प्रसंग !

मलप्पुरम् (केरळ) – जिल्ह्यातील तेनिपलम् शहरात १९ फेब्रुवारी या दिवशी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेने मोपला हत्याकांडाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ ती घटना साजरी करण्यासाठी मिरवणूक काढली होती. त्या वेळी धर्मांधांनी हिंदूंचा नरसंहार केला होता. या मिरवणुकीत रा.स्व. संघाचा गणवेश परिधान केलेल्या पुरुषांना बेड्या ठोकल्याचा प्रसंग दाखवण्यात आला. (हिंदूंचे धर्मांतर आदी गोष्टींना संघाचा विरोध असतो. त्यामुळे पी.एफ्.आय.सारख्या जिहादी संघटना संघाला पाण्यात पहातात. अशा पराकोटीची हिंदुद्वेषी संघटना भारतात अजूनही मोकाट कशी ? – संपादक) या मिरवणुकीत ‘अल्लाहू अकबर’ आणि अन्य इस्लामी घोषण देण्यात आल्या. या मिरवणकीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

१. मिरवणुकीत संघाच्या गणवेशातील लोकांव्यतिरिक्त ब्रिटीश अधिकार्‍यांचा गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीही होत्या. त्यांना दोरखंडाद्वारे बेड्या घालण्यात आल्या होत्या. या दोरखंडांचे दुसरे टोक गोल टोप्या आणि लुंगी नेसलेल्या व्यक्तींच्या हातामध्ये होते.

२. सूत्रांनी सांगितले आहे की, पी.एफ्.आय.च्या या मिरवणुकीचा उद्देश वर्ष १९२१ च्या ‘मलबार हिंदू नरसंहार’ किंवा ‘मोपला हत्याकांडा’ची शताब्दी ‘साजरी करणे’ हा आहे. या नरसंहारात १० सहस्रांहून अधिक हिंदूंना ठार करण्यात आले होते. तसेच १ लाख हिंदूंना केरळ सोडण्यास भाग पाडण्यात आले.

मलबार हिंदू नरसंहाराचा मान्यवरांनी केलेला उल्लेख !

१. स्वातंत्र्सैनिक अ‍ॅनी बेसेंट यांनी त्यांच्या पुस्तकात ‘मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात हिंदूंची हत्या केली आणि त्यांना लुटले. धर्मांतर न करणार्‍या सर्व हिंदूंना ठार मारले किंवा पळवून लावले. इस्लामी नियम अजूनही कसे आहेत हे मला मलबार घटनेने शिकवले आहे आणि आम्हाला खिलाफत राज्यातील आणखी एक नमुना भारतात पहायचा नाही’, असे लिहिले आहे.

२. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, मलबार येथे मोपलांकडून हिंदूंवरील अत्याचार सांगता न येणारे आहेत. संपूर्ण दक्षिण भारतभर, सर्व हिंदूंमध्ये भयानक भावनेची लाट पसरली होती. विशेष म्हणजे खिलाफत नेत्यांनी मोपलांना त्यांनी धर्मासाठी दिलेल्या ‘बहादूर लढ्या’विषयी त्यांचे अभिनंदन करणारे ठराव संमत केले. नरसंहारात नष्ट झालेल्या हिंदु मंदिरांची संख्या १०० असल्याचा अंदाज आहे. हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर झाले.