ही संख्या शून्य होणे हीच स्थिती खर्या अर्थाने सीमा सुरक्षित असल्याचे दर्शक ठरील !
नवी देहली – वर्ष २०२० मध्ये भारत आणि बांगलादेश सीमेवर घुसखोरीच्या प्रकरणांत गेल्या वर्षांच्या तुलनेत घट झाली आहे. वर्ष २०२० मध्ये घुसखोरीची ४८९ प्रकरणे घडली. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत ही माहिती लेखी उत्तरात दिली. या प्रकरणांत ९५५ लोकांना अटक करण्यात आली.
राज्यसभा में भारत-बांग्लादेश सीमा पर घुसपैठ पर सरकार ने कहा, 2020 में 2016 के मुकाबले घुसपैठ के मामलों में आई कमी
(@ashokasinghal2 )— AajTak (@aajtak) February 10, 2021
वर्ष २०१६ मध्ये ६५४ घटना घडल्या, तर १ सहस्र ६०१ लोकांना अटक करण्यात आली होती. वर्ष २०१७ मध्ये ४५६ प्रकरणे आणि ९०७ जणांना अटक, वर्ष २०१८ मध्ये ४२० घटना, तर ८८४ जणांना अटक आणि वर्ष २०१९ में ५०० घटना आणि १ सहस्र १०९ लोकांना अटक करण्यात आली. येथील बंगालच्या सीमेवरून तारांचे कुंपण लावण्यासाठी भूमी अधिग्रहण करण्याची ३३ प्रकरणे प्रलंबित असल्याने तेथे अजून कुंपण घालणे शेष आहे. ७६ टक्के भूमीवर कुंपण घालण्यात आले आहे.