काळाच्या पुढे जाऊन साधकांची पदोपदी काळजी घेणारे परात्पर गुरु डॉक्टर !

साधकांचे तारणहार परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. कोरोना आपत्तीच्या काळात वैद्यांकडून बाहेरून घरात जातांना हात-पाय धुवून जाण्यास सांगितले जाणे

अलीकडे कोरोनामुळे उद्भवलेल्या या आपत्काळामध्ये अनेक वैद्यांकडून आपल्याला सांगण्यात येत आहे की, बाहेरून घरात येतांना हात-पाय धुवूनच घरात जा. बर्‍याच ठिकाणच्या प्रवेशद्वारांवर जंतुनाशक फवारणारी उपकरणे बसवलेली आढळतात. ही उपकरणे आत येणार्‍या व्यक्तीला निर्जंतुक करतात.

२. अनेक वर्षांपासून सनातन संस्थेच्या आश्रमांत, तसेच साधकांच्या घरी तीर्थ शिंपडून प्रवेश करण्याची पद्धत चालू असल्याने त्यामुळे सूक्ष्मातील निर्जंतुकीकरण होत असणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा सर्व साधकांना नुसते शिकवले नाही, तर बर्‍याच वर्षांपासून आमच्याकडून हे करवूनही घेतले आहे. सनातन संस्थेच्या प्रत्येक आश्रमाच्या प्रवेशद्वारावर हात-पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. याच्याही पुढे जाऊन नुसत्या स्थूल देहापेक्षा व्यक्तीच्याा देहावर आलेले सूक्ष्मातील आवरण, म्हणजेच सूक्ष्म विषाणू, जंतू, त्रासदायक शक्ती आदी नष्ट होण्यासाठी आश्रमाच्या प्रवेशद्वारावर तीर्थ (गोमूत्र आणि पाणी यांचे मिश्रण) ठेवलेले असते. हे तीर्थ स्वतःच्या अंगावर शिंपडून मगच सर्व साधक आश्रमात प्रवेश करतात. हे तीर्थ म्हणजे एक प्रकारचे सूक्ष्मातील निर्जंतुकीकरण द्रव्यच आहे. हीच व्यवस्था संस्थेची लहान सेवाकेंद्रे, तसेच साधकांची घरे या ठिकाणीसुद्धा पहायला मिळते.

काळाच्या पुढे जाऊन साधकांची पदोपदी काळजी घेणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, तरी तो अल्पच आहे.

– श्री. नीलेश पाध्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२०)