मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भात ओबीसी समाजाला जागृत करण्याचे काम करावे लागेल ! – अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

छगन भुजबळ

पुणे – मराठा आरक्षणाचा विषय वेगळ्या मार्गावर जात आहे. अन्य मागासवर्गीय समाजात (ओबीसी) समाविष्ट असलेल्या जाती अवैध असून त्यांना बाहेर काढून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, या मागणीसाठी मराठा समाजातील काही नेत्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ते सर्वोच्च न्यायालयातही जाण्याविषयी बोलत आहेत. अशा परिस्थितीत आता ओबीसी समाजाला जागृत करण्याचे काम आम्हाला करावे लागेल, असे मत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी २८ नोव्हेंबर या दिवशी व्यक्त केले.

परिषदेच्या वतीने दिला जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.