इंदापूर तालुक्यामधील (जिल्हा पुणे) इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या ३३ शाळा चालू

प्रातिनिधिक छायाचित्र

वालचंदनगर – इंदापूर तालुक्यात १०४ शाळा असून त्यात १८ सहस्र ६१० विद्यार्थी आहेत. त्यातील ३३ शाळा पहिल्या दिवशी चालू झाल्या आणि त्यामध्ये १ सहस्र ३८८ विद्यार्थी उपस्थित होते. ज्या शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण होऊन अहवाल आला आहे त्या शाळा चालू केल्या आहेत, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी दिली. संपूर्ण शाळेचा परिसर निर्जंतुक केला होता. एका वर्गामध्ये ५ ते १० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांचा ताप थर्मामीटरने तपासून आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणी करून विद्यार्थ्यांना वर्गात बसवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाने हमीपत्रही दिले होते.