
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत विशिष्ट प्रकारचा सुगंध येणे आणि त्यांनी या सुगंधाविषयी सूक्ष्मातील विविध प्रयोग करून घेणे
‘वर्ष २००५ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाचे बांधकाम पूर्ण झाले. साधारणतः वर्ष २००६ मध्ये आम्ही रामनाथी आश्रमात कायमचे रहाण्यासाठी आलो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ज्या खोलीत रहायचे, तेथे एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येत असे. वर्ष २००७ मध्ये या सुगंधाचे प्रमाण पुष्कळच वाढले. या सुगंधाच्या संदर्भात गुरुदेव आमच्याकडून सूक्ष्मातील विविध प्रयोग करून घेत असत.
२. आश्रमात प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र ठेवलेल्या ठिकाणी सुगंध दरवळण्याचे प्रमाण अधिक असणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आम्हाला ‘आश्रमात असा सुगंध इतरत्र कुठे येतो का ?’, ते पहाण्यास सांगत. कधी कधी आश्रमात काही ठिकाणी असा सुगंध येत असे; पण तेथे सुगंध येण्याचे प्रमाण अल्प होते. ध्यानमंदिर किंवा स्वागतकक्ष या ठिकाणी जेथे प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र ठेवलेले असे, तेथे सुगंध दरवळण्याचे प्रमाण अधिक होते.

३. सनातनवर आलेल्या कठीण परिस्थितीच्या वेळी सुगंधाचे स्वरूप पालटून ते मारक होणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘मारक गंधातून देव रक्षण करत असून आश्रम अन् साधक यांच्याभोवती संरक्षणकवच बनवत आहे’, हे लक्षात आणून देणे
वर्ष २००९ नंतर सनातनवर बंदीसारखी अनेक संकटे आली. काही साधकांना काही मिथ्या आरोपांखाली कारावासही भोगावा लागला. या परिस्थितीत मात्र येणार्या सुगंधाचे स्वरूप पालटले. तो आणखीन आणखी मारक होऊ लागला. नंतर तो इतका मारक स्वरूपाचा झाला की, कधी कधी तो सुगंध आत घेत असतांना छाती भरून जात असे. त्याची तीव्रता एवढी असे की, कधी हा सुगंध पूर्ण श्वासातून आत भरून घेणे अशक्य होत असे. यावरून गुरुदेवांनी लक्षात आणून दिले की, ‘या मारक गंधातून देव आपले रक्षण करत आहे आणि आपले आश्रम अन् साधक यांच्याभोवती संरक्षककवच बनवत आहे.’
४. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर साक्षात् देवच आहेत’, हे त्यांची पडताळणी करायला आणलेल्या श्वानालाही कळणे, त्यामुळे खोलीत येताच तो गुरुदेवांच्या चरणांशी बसून रहाणे
गुरुदेवांची चौकशी करायला एक दिवस पोलीस आश्रमातील त्यांच्या खोलीत आले असतांना या गंधाची तीव्रता पुष्कळच वाढली होती. खोलीची पडताळणी करायला पोलिसांनी एक श्वान आणले होते. खोलीत येताक्षणी ते गुरुदेवांच्या चरणांशीच बसून राहिले. ते खोलीत फिरलेच नाही. यावरून लक्षात आले, ‘गुरुदेव म्हणजे साक्षात् देव आहेत’, हे त्या श्वानालाही कळले होते; पण इतरांना कळले नाही !
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य जसे विश्वव्यापक होत गेले, तसे सुगंधाच्या प्रभावळीत वाढ होऊन तिचे प्रक्षेपण वाढणे
वर्ष २००९ नंतर ‘हा दैवी सुगंध रामनाथी आश्रमात कायमचाच रहायला आला’, असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. आता इतक्या वर्षांनंतर ‘पूर्ण आश्रमच सुगंधित झाला आहे आणि आश्रमाचे चैतन्य ४ – ५ कि.मी. अंतरापर्यंत वाढत चालले आहे’, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. जसे प.पू. डॉक्टरांचे कार्य विश्वव्यापक होत चालले आहे, तसे सुगंधाच्या प्रभावळीतही वाढ होऊन तिचेही प्रक्षेपण वाढले.
आता गुरुदेवांनी निर्मिलेल्या पृथ्वीवरच्या सर्वत्रच्या आश्रमातही असे विविध दैवी सुगंध येत आहेत; पण ‘या दैवी सुगंधाचे मूळ ऊर्जास्रोत मात्र प.पू. डॉक्टरच आहेत’, यात शंका नाही.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तिरूवण्णमलई, तमिळनाडू. (१४.१२.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |