शनिवारवाडा पर्यटकांसाठी तातडीने चालू करावा ! – ब्राह्मण महासंघाची मागणी

पुणे – ‘अनलॉक’ नंतर सर्व धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळे उघडण्यास केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकारनेही ऐतिहासिक स्थळे उघडण्यास अनुमती दिली आहे; मात्र शनिवार वाडा पर्यटकांसाठी अजूनही बंद आहे. बंद असलेला शनिवार वाडा पर्यटकांसाठी तातडीने चालू करावा, अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. पुरातत्व खात्याने २ दिवसात शनिवार वाडा पर्यटकांसाठी न उघडल्यास ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी स्वतःहून शनिवार वाडा उघडतील, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. यावर वरीष्ठ अधिकारी सुट्टीवर असल्याने ४ दिवस थांबण्याची विनंती पुरातत्व खात्यातील अधिकार्‍यांनी केली आहे.