मुंबईतील कराची स्वीट्सचं नाव पालटा !

शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची मागणी

मुंबई – कराची स्वीट्स या नावाने अनेक दुकानांची साखळी देशातील प्रमुख शहरे आणि महानगरे यांमध्ये आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ही दुकाने आहेत. कराची पाकिस्तानातील आहे, त्यामुळे आपल्या लष्करी सैनिकांचा अपमान होतो. त्यामुळे वांद्रे भागात असलेल्या या दुकानाचे नाव पालटण्याची मागणी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी केली आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रात कराची नावाने कोणतेही व्यवसाय चालणार नाहीत. यामुळे  पाकिस्तानला पाठिंबा दिल्याप्रमाणे होते. महाराष्ट्रात रहायचे असेल, तर असे नाव चालणार नाही, अशी चेतावणी नांदगावकर यांनी दिली आहे.