सनातन संस्थेमध्ये असलेले समष्टी साधनेचे महत्त्व !

‘व्यष्टी साधना करणारे फार थोडे साधक संतपदापर्यंत जातात, तर समष्टी साधना करणारे पुष्कळ साधक संतपद गाठतात. त्यामुळे सनातन संस्थेमध्ये समष्टी साधनेला महत्त्व आहे. पुढील १० वर्षांत समष्टी साधना करून १ सहस्रांहून अधिक साधक संतपदाला जातील. अनेक संतांकडे ‘संत’पदाला लायक कुणी नसतेच. ‘आता मी गेल्यावर गादीवर कोण ?’, अशी तेथे स्थिती असते. आपल्याकडे तसे नाही. आपल्याकडे ठिकठिकाणी संत आहेत. निरनिराळ्या राज्यांतही आणि सर्वत्र संत आहेत. व्यष्टी आणि समष्टी साधनेतील हाच मुख्य भेद आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले