रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

१. श्री. संजय र. ठाकूर (संस्थापक अध्यक्ष, राष्ट्र जागृती मंच), अकोला, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रम पाहून मला शांती आणि आनंद यांची अनुभूती आली.

आ. आश्रम पाहिल्यावर मला ‘भावी ‘हिंदु राष्ट्र’ कसे असेल ?’, याची प्रचीती आली.

इ. माझा उत्साह वाढला.

ई. मला सनातन संस्थेचे महत्त्व कळले.’

२. श्री. महेश चंद्रसेन मयेकर (संस्थापक अध्यक्ष, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान),  राजापूर, रत्नागिरी, महाराष्ट्र.

अ. ‘नव्याने पुन्हा आश्रम पहातांना आश्रमातील चैतन्य अधिकाधिक वाढल्याचे मला जाणवले.

आ. आश्रम पहातांना मला एक वेगळा उत्साह जाणवत होता.

इ. एक सकारात्मक ऊर्जा सतत माझ्या समवेत असल्याची जाणीव मला होत होती.’

३. सौ. शालिनी चंद्रकांत कदम (श्रीदेवी महिला मंडळ), रत्नागिरी, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रम पाहून मला पुष्कळ छान वाटले.

आ. आता आपण ज्ञानापासून वंचित आहोत; परंतु मला ‘पुढे आपला भारत पुन्हा सर्वाेत्तम होईल’, याची निश्चिती वाटली.’

४. श्री. वासुदेव हरिदास राठोड (जिल्हा सह समन्वयक, अखिल विश्व गायत्री परिवार), चंद्रपूर, महाराष्ट्र.

अ. ‘मला आश्रमातील साधकांच्या साधनेच्या प्रभावाची सात्त्विक अनुभूती आली.

आ. माझा भाव जागृत झाला.

इ. ‘आश्रम हे जनजागृतीचे केंद्र आहे’, असे मला वाटले.

ई. इथे खर्‍या अर्थाने ईश्वरी कार्य होत आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.६.२०२४)