ठाणे येथील कु. ईशान कौसडीकर (वय ७ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

कु. ईशान कौसडीकर

ठाणे, ३० जून (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेला ‘ऑनलाईन बालसंस्कारवर्ग’ नियमित बघणारा आणि त्याप्रमाणे कृती करणारा ठाणे येथील कु. ईशान अरविंद कौसडीकर (वय ७ वर्षे) याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाला आहे. सनातन संस्थेच्या सौ. वैशाली कोथमिरे यांनी कु. ईशान कौसडीकर याची आध्यात्मिक पातळी ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे घोषित केली. या वेळी त्याचे कुटुंबीयही या कार्यक्रमाला जोडले होते.