
‘मणिकांत हा रामकृष्णांचा अनुग्रहित आहे. २८ वर्षांचा हा युवक विवाहित आहे. भगवंताची, राम-कृष्णाची, सत्संगाची विलक्षण ओढ आहे. त्याच्या पत्नीला ते रूचत नाही. मणिकांत रामकृष्णांना सांगतात, ‘‘पत्नी म्हणते, हे देव-देव बंद केले तर ठीक. नाहीतर मी आत्महत्या करीन. तुमच्यावर हत्येचा दोष लावीन. काय करू मी ?’’
श्रीरामकृष्ण गंभीर होतात. त्यांचे नेत्र चमकतात. ते उद्गारतात, ‘‘भगवंताच्या आड जी पत्नी येते, ती पत्नीच नाही. ती वैरीण ! तिचा त्याग करावा. सोडून दे तिला. भलेही ती आत्महत्या करू देत. हवे ते करू दे ! त्याची चिंता नको ! ईश्वराकडे जाण्यासाठी जी अटकाव करते, ती अविद्या ! तिला बाजूलाच सारले पाहिजे.’’
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१२)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मंगळुरू सेवाकेंद्रातील साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
साधना, परिपूर्ण सेवा आणि गुरुकृपा दर्शवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीचे भावमोती !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे
प्रामाणिक प्रयत्न करतो तो शिष्य !
‘गुरूंच्या संकल्पाने शिष्याची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !