प.पू. डॉक्टर, तुम्ही वर्ष २००६ मध्ये ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो’ या काव्याद्वारे म्हणाला होतात की,
अ. ‘तुमच्याजागी मी असतो, तर सनातनला सोडून दिले असते.’
प.पू. डॉक्टर, आमच्याही मनात असंख्य वेळा हा विचार येतो; पण तुम्हाला सोडवत नाही. हे त्रासही आनंदाने भोगण्याची क्षमता आणि प्रेरणा तुम्हीच आमच्यात निर्माण करता.
आ. ‘कलियुगात पितृयान (टीप) मार्गाने जावे लागते. पितृयानमार्ग पाताळातून जातो.’
समवेत तुम्ही असल्यामुळे पाताळांतून जाणारा मार्गही फुलांनी सजवल्यासारखा जाणवतो. (टीप) – सप्तपाताळातून ईश्वराकडे जाण्याचा मार्ग
इ. ‘वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे आलेला आंधळेपणा, बेशुद्धावस्था आदी सर्वकाही तुम्ही हसतमुखाने स्वीकारत आहात.’
प.पू. डॉक्टर तेही तुमच्याच प्रेमामुळे शक्य होते !
ई. ‘सातत्याने मोठमोठी आक्रमणे करणार्या वाईट शक्ती हरल्या अन् साधकांनो, तुम्ही जिंकलात’
तुमच्या प्रेमापुढे वाईट शक्ती हरत आहेत आणि तुम्ही जिंकत आहात; कारण तुम्ही आहात ‘जयंत’ !
उ. ‘पितृयानमार्गाचे कलियुगातील आपण पहिले प्रवासी । आपल्याला सप्तपाताळांना भेदून पुढे जायचे आहे.’
पहिले प्रवासी बनण्याचा मान आम्हाला तुमच्यामुळेच मिळाला आणि सप्तपाताळांना भेदून तुम्हीच पुढे नेत आहात.
ऊ. ‘आंधळे, बहिरे, मुके, अपंग अशा साधकांना घेऊन स्थूल आणि सूक्ष्म यांतून लढत पुढे जायचे आहे.’
यासाठी लागणारी चिकाटी आणि जिद्द तुम्हीच निर्माण करत आहात आणि आम्हाला पुढे नेत आहात.
ए. तुम्ही म्हणाला होतात, ‘करू प्रार्थना ईश्वराला, लवकर अवतार घेण्या’; पण तुमचे अवतारत्व महर्षींनी उलगडल्यामुळे आता आम्ही म्हणतो, ‘करू प्रार्थना परात्पर गुरूंना, हिंदु राष्ट्र शीघ्रतेने येण्या ।’
ऐ. शेवटी तुम्ही म्हणालात, ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो ।’
‘प.पू. डॉक्टर, तुम्ही ‘हर’लात, म्हणूनच ‘हरि’ झालात ।
– श्री. वीरेंद्र पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक