
मुंबई – कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धीविनायक गणपति मंदिर न्यासाच्या वतीने रक्तसंकलन अभियान राबवण्यात येणार आहे. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर याविषयी म्हणाले की, मुंबईत रहाणार्या ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे, त्यांनी स्वत:चे नाव श्री सिद्धीविनायक मंदिरात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत (०२२)२४२२४४३८/२४२२३२०६ या दूरभाषवर कळवावे. रक्तदात्याच्या रहात्या घराच्या जवळ थेट वसाहतीच्या आवारात न्यासाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची रक्तसंकलनाची गाडी पोचेल. त्यामुळे रक्तदात्यांना रहात्या ठिकाणी रक्तदान करता येईल. गर्दी न करता रक्तदान करावे आणि रक्तसंकलन करण्यासाठी सहकार्य करावे.
मराठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील प्रादेशिक अस्मितेचे सूत्र निरर्थक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !