कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची अफवा पसरवणार्‍यास पोलिसांनी घेतले कह्यात

नागपूर – कोरोना विषाणूच्या संदर्भात ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ध्वनीमुद्रित क्लिप सिद्ध करून अफवा पसरवणार्‍या एका संशयित व्यक्तीस येथील पोलिसांनी २६ मार्च या दिवशी कह्यात घेतले आहे. या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५४  नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस याविषयी अधिक चौकशी करत आहेत. तसेच कोरोना विषाणूच्या अनुषंगाने अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.