सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे !

श्री. दादा वेदक यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, आश्रमात पाय ठेवताच सकारात्मक ऊर्जा जाणवली. आश्रमातील स्वच्छता आणि सेवाभाव कौतुकास्पद आहे.

भोकरदन (जिल्हा जालना) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश असूनही १ मास नळाला पाणी नाही !

भोकरदन शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यातच जलवाहिनी घालतांना केबल तुटल्यामुळे भोकरदन शहराचा पाणीपुरवठा २ दिवसांपासून विस्कळीत झाला आहे.

कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात येणार्‍या भरतीचे दिनांक घोषित !

कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्याचे वेळापत्रक हवामान विभागाने आताच घोषित केले आहे.  या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

आषाढी पायी वारीचे २९ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान !

आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची पंढरपूर येथे पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी आषाढी पायी वारी यंदा २९ जून या दिवशी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

गोवा : रगाडा नदीत केलेल्या रेतीच्या उत्खननाचे अन्वेषण करा !

समुद्रकिनार्‍यांवरील अनधिकृत बांधकाम असो किंवा अनधिकृत रेती उत्खनन असो, या गोष्टींची न्यायालयालाच नोंद घ्यावी लागणे प्रशासनासाठी लज्जास्पद !

भाविकांच्या अलोट गर्दीत आणि अपार उत्साहात झाला श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव सोहळा !

वर्ष १८२४ पासून हा रथोत्सव चालू आहे. हा रथोत्सव भक्ती आणि शक्तीचा उत्सव मानला जातो. चैत्र पौर्णिमेला जोतिबा येथील यात्रा झाल्यावर प्रत्येक वर्षी हा रथोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.

धर्मांध पोलिसाच्या फितुरीमुळे अमली पदार्थाच्या तस्कराला लाभ !

धर्मांधांना पोलीस किंवा सैन्य यांमध्ये नोकरी देणे किती घातक आहे, हे लक्षात घ्या !

Loksabha Elections 2024 : मतांसाठी धर्माच्या आधारे भेदभाव करू नये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

गोव्यात धर्माच्या आधारावर राजकारण का केले जात आहे ? गोवा सरकारमध्ये अल्पसंख्य मंत्री आणि आमदार आहेत. धर्म आणि राजकारण हे एकमेकांत मिसळू नये. मतांसाठी धर्माच्या आधारावर भेदभाव करू नये.

सिंधुदुर्ग : पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांना ५ मास वेतन नाही

सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आणि रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या भोंगळ कारभारामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी या प्रश्नी कामगार न्यायालयात जाण्याची चेतावणी दिली आहे.

पुणे महापालिकेच्या उपअभियंत्याकडून तृतीयपंथीय सुरक्षारक्षकांना मारहाण !

पूर्वीही मारहाण केली म्हणून केले होते निलंबित !