जिहाद्यांची हिंदुविरोधी मानसिकता !

हिंदूंच्या मंदिरांकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही, एवढा वचक भारताने निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांना सुरक्षा पुरवण्यासह जे जिहादी आतंकवादी त्यांना लक्ष्य करू पहात आहेत, त्यांच्या तळात घुसून त्यांना अद्दल घडवली पाहिजे. असे केले, तरच गोरखनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणासारखे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.

अयोध्येतील मंदिरे, मठ आणि धार्मिक स्थळे यांना भरावा लागणारा कर रहित !  

अयोध्येतील मंदिरे, मठ आणि अन्य धार्मिक स्थळे यांना भरावा लागणारा व्यावसायिक कर रहित करण्यात करण्याचा आदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील नगरपालिकेला दिला.

चैत्र नवरात्रीच्या ९ दिवसांत मांस विक्रीची दुकाने बंद ठेवा !

जर उत्तरप्रदेश सरकार असा आदेश देऊ शकते, तर अन्य भाजपशासित राज्ये का देऊ शकत नाहीत ?, असा प्रश्‍न हिंदू भाविकांच्या मनात उपस्थित होतो !

मला मंत्रीपद मिळणे, ही समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांना चपराक ! – योगी शासनातील एकमेव मुसलमान मंत्री

भाजपने माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कार्यकर्त्यावर विश्‍वास टाकला. राज्यशासनाने मुसलमानांसाठी पुष्कळ कार्य केले आहे’, असे वक्तव्य नवनिर्वाचित योगी शासनातील एकमेव मुसलमान राज्यमंत्री दानिश अन्सारी यांनी केले.

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

योगी आदित्यनाथ यांनी २५ मार्च या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. येथील इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा पार पाडला. या वेळी २ उपमुख्यमंत्री, २ महिला मंत्री यांच्यासह एकूण ५२ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

योगी आदित्यनाथ हे हिंदु राष्ट्रातील प्रथम पंतप्रधान असतील !

मुख्यमंत्रीपदाच्या मागील कार्यकाळात त्यांच्यावर कोणताही डाग नाही. त्यांनी ज्याप्रकारे काम केले आहे, त्यावरून येणार्‍या काळात ते देशाची सूत्रे सांभाळतील, हे लक्षात येते. ते पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार आहेत आणि एक दिवस देशाचे पंतप्रधान बनतील, असे भविष्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

नरेंद्र मोदी १२ वर्षे पंतप्रधानपदी रहातील ! – महामंडलेश्‍वर स्वामी यतींद्र आनंद गिरि याचां ग्रह-नक्षत्रांच्या आधारे दावा

ते पुढे म्हणाले, मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान बनतील. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान बनून ‘हिंदु राष्ट्रवादा’चे स्वप्न पूर्ण करावे.

हिंदुद्वेषी ‘अल्-जजीरा’ !

भारत सरकारने ‘अल्-जजीरा’ची काळी बाजू वेळीच लक्षात घेऊन तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी. इस्लामी महत्त्वाकांक्षेच्या बळावर भारताची अपकीर्ती करणार्‍या ‘अल्-जजीरा’ला रोखठोक प्रत्युत्तर दिले तरच अन्य विदेशी प्रसारमाध्यमांकडून केल्या जाणार्‍या भारतविरोधी वृत्तांकनाला आळा बसेल !

योगी आदित्यनाथ यांनी मोडले ३ मोठे विक्रम !

योगी आदित्यनाथ सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत. एकूणच उत्तरप्रदेश राज्याच्या इतिहासात सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनणारे योगी आदित्यनाथ पाचवे मुख्यमंत्री असणार आहेत.

हा हिंदुत्वाचा विजय !

देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागला. मतदारांचा एकूणच कल पहाता यंदाच्या निवडणुकीत आक्रमक आणि रोखठोक हिंदुत्व अन् राष्ट्रीयत्व यांना बहुमत मिळाले आहे, असे सहजच दिसून येते.