मला मंत्रीपद मिळणे, ही समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांना चपराक ! – योगी शासनातील एकमेव मुसलमान मंत्री

योगी शासनातील एकमेव मुसलमान राज्यमंत्री दानिश अन्सारी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘मला मंत्रीपद मिळणे, ही समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांना चपराक आहे.

भाजपने माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कार्यकर्त्यावर विश्‍वास टाकला. राज्यशासनाने मुसलमानांसाठी पुष्कळ कार्य केले आहे’, असे वक्तव्य नवनिर्वाचित योगी शासनातील एकमेव मुसलमान राज्यमंत्री दानिश अन्सारी यांनी केले.