योगी आदित्यनाथ यांचा वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये सहज विजय होईल ! – पी.व्ही.आर्. नरसिंह राव, अमेरिकास्थित प्रख्यात ज्योतिषी

वर्ष २०३०-३१ मध्ये विश्वयुद्ध होणार असून योगी आदित्यनाथ भारताचे नेतृत्व करतील, असेही त्यांनी वर्तवले आहे.

‘बदायू’चे पूर्वीचे नाव ‘वेदामऊ’ होते ! – योगी आदित्यनाथ

प्राचीन काळामध्ये ‘बदायू’चे नाव ‘वेदामऊ’ होते. ते वेदांच्या अध्ययनाचे स्थान होते. असेही म्हटले जाते की, गंगानदीला पृथ्वीवर आणणारे महाराजा भगीरथ यांनी येथेच तपस्या केली होती, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

अयोध्येतील दीपोत्सवात शरयू नदीच्या घाटावर प्रतिदिन लावण्यात येणार ९ लाख दिवे !

अयोध्येत ३ नोव्हेंबरपासून चालू होणार्‍या दीपोत्सवात प्रतिदिन शरयू नदीच्या घाटावर ९ लाख दिवे लावण्यात येणार आहेत. यासह अयोध्येतील प्राचीन मठ मंदिर आणि कुंडावर ३ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत.

(म्हणे) ‘महंमद अली जीना हे स्वातंत्र्यलढ्याचे नायक होते !’ – अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष

मुसलमानांच्या मतांसाठी देशाच्या फाळणीला आणि त्यानंतर झालेल्या १० लाख हिंदूंच्या हत्याकांडाला उत्तरदायी असलेल्या जिनांचा असा उदोउदो करणार्‍या अखिलेश यादव यांना सरकारने कारागृहात टाकून त्यांच्या पक्षावर बंदी घातली पाहिजे !

अफगाणिस्तानातील काबुल नदीच्या पाण्याद्वारे अयोध्येतील राममंदिराच्या ठिकाणी जलाभिषेक !

अफगाणिस्तान येथून एका तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काबुल नदीचे पाणी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या श्रीराममंदिराच्या स्थानावर जलाभिषेक करण्यासाठी पाठवले होते.

उत्तरप्रदेशात पाक क्रिकेट संघाचा विजय साजरा करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा होणार नोंद !

अशांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा झाली पाहिजे !

मलबार (केरळ) येथे वर्ष १९२१ मध्ये धर्मांधांकडून नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार ! – योगी आदित्यनाथ

केरळच्या मलबारमध्ये वर्ष १९२१ मध्ये मोपला हत्याकांडाद्वारे नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. जिहाद्यांनी १० सहस्रांहून अधिक हिंदूंची हत्या केली, अनेक मंदिरे पाडण्यात आली, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूचे गूढ कायम

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. पोलिसांनी या मृत्यूविषयी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मथुरेमध्ये दारू आणि मांस यांच्या विक्रीवर सरकारकडून बंदी

देशातील प्रत्येक तीर्थस्थानी अशा प्रकारची बंदी घालण्याचा आदेश केंद्र सरकारने द्यावा, असेच हिंदूंना वाटते ! हे उत्तरप्रदेश सरकारला शक्य आहे, तर केंद्र सरकार, तसेच अन्य भाजप शासित राज्ये यांनाही ते सहज शक्य असणार, यात शंका नाही !

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते कल्याण सिंह यांचे २१ ऑगस्टच्या रात्री येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कल्याण सिंह गेल्या मासापासून उपचारार्थ रुग्णालयात भरती होते.