नोंदणीकृत वारकर्‍यांच्या दिंड्यांना राज्यशासनाकडून २० सहस्र रुपये अनुदान मिळणार !

मुंबई – आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून निघणार्‍या नोंदणीकृत दिंड्यांना राज्यशासनाकडून २० सहस्र रुपयांचे अनुदान मिळणार आहे. ‘वारकरी साहित्य परिषद मंडळा’ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दिंड्यांना ५० सहस्र रुपये अनुदान देण्याचे मागणी केली होती. चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी २० सहस्र रुपये अनुदान देण्याचे निर्देश दिले आहेत.

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने दिंड्या-पालख्या प्रतिवर्षी पंढरपूरला जातात. या पालख्या-दिंड्या पंढरपूर येथे पायी प्रवास करतात. या प्रवासाच्या कालावधीत अनेक वारकरी आजारी पडतात, काहींचे अपघात होतात, त्यांना दुखापत होते, तसेच काहींचा दुर्घटनेत मृत्यूही होतो. त्यामुळे वारकरी परिषदेच्या विनंतीनुसार मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.