राज्यपालांचा विधानसभेत एवढा अवमान क्वचित्च झाला असेल ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘अंतिम आठवडा प्रस्तावा’वर भाषण

‘द काश्मीर फाईल्स’ करमुक्त करण्याविषयी भाजपच्या ९२ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

अर्थमंत्री अजित पवार यावर सकारात्मक भूमिका घेतील, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा !

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एका पत्राद्वारे केली.

भाईंदरच्या जंजिरे धारावी गडदुर्गाच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन !

गडदुर्गाचे संवर्धन व्हावे, यासाठी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन गडदुर्गाच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींना तातडीने पत्र पाठवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही !

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी विधान परिषद सभापती यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समवेत विधानभवन येथे बैठक झाली.

नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याविना संघर्ष थांबणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

पाटील सत्ताधार्‍यांना उद्देशून म्हणाले की, तुमचे नाव दाऊदशी जोडले गेले आहे. तुम्ही दाऊदला संरक्षण देण्यासाठी त्याला साहाय्य करणार्‍याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष उपस्थिती !

प्रकृतीच्या कारणांमुळे मागील २ मासांपासून शासकीय कार्यक्रमांना मुख्यमंत्री ‘ऑनलाईन’ सहभागी होत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते.

नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करा ! – रत्नागिरी भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र

देशद्रोहासारखे आरोप ज्या ठिकाणी लावले गेले आहेत अशा मंत्र्यांनी तात्काळ त्यागपत्र देणे अभिप्रेत आहे; मात्र संबंधित व्यक्ती स्वतः त्यागपत्र देत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून अशा आरोपी मंत्र्याला डच्चू दिला पाहिजे.

मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव कंत्राटदारांकडून घेतलेली टक्केवारी बनावट आस्थापनांच्या माध्यमातून इतरत्र वळवायचे ! – किरीट सोमय्या, भाजप

भाजपच्या किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद – महाविकास आघाडीवर गंभीर आरोप