कामात हलगर्जीपणा केल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल ! – उद्धव ठाकरे

संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – कोणत्याही परिस्थितीत संभाजीनगर शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. याविषयी कारणे सांगू नका. तातडीने मार्ग काढा. आयुक्तांनी यामध्ये स्वत: लक्ष घालावे. या कामात हलगर्जीपणा केल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. २ जून या दिवशी संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्र्यांनी वर्षा या निवासस्थानी आढावा घेतला. पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी ‘मुख्यमंत्री संकल्प कक्षा’तून कामाचा नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देश या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. या बैठकीला संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांसह मुख्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.