ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे निधन !

बजाज उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (वय ८३ वर्षे) यांचे १२ फेब्रुवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता वयोमान आणि हृदयाचा विकार यांमुळे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते.

जळगाव येथे अण्णा हजारे यांच्या ‘भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासा’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

हा निर्णय त्वरित रहित न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणास आणि आंदोलनास सर्व स्तरांतून पाठिंबा दिला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

एस्.टी. कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्याविषयी नक्षलवाद्यांनी सालेकसा (गोंदिया) पोलीस ठाण्याजवळ झळकावली भित्तीपत्रके आणि फलक !

कित्येक दशकांपासून चालू असलेला माओवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश !

क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचे पाप सरकारने स्वत:च्या माथी घेऊ नये !

हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे आवाहन ! हिंदुबहुल महाराष्ट्रात असे आवाहन का करावे लागते ? प्रशासनाच्या हे स्वतःहून लक्षात का येत नाही ?

लोकप्रतिनिधींचे वागणे आदर्शच हवे !

नाना पटोलेंसारख्या लोकप्रतिनिधींनी आणि राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्याने देशाच्या पंतप्रधानांविषयी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य करणे, हे अत्यंत लाजिरवाणे अन् संस्कृतीला काळीमा फासणारे आहे.

मद्यविक्री करणार्‍या दुकानांना महापुरुषांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह ! – हिंदु जनजागृती समिती

गेल्या १० वर्षांत हिंदु जनजागृती समितीने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मद्यविक्री करणार्‍या दुकानांना महापुरुषांची नावे न देण्याची दिली होती निवेदने !

मराठी पत्रकारितेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य ! – मुख्यमंत्री ठाकरे

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वत:च्या विद्वत्तेच्या बळावर परकीय राजवटीत मराठी पत्रकारितेचा पाया घातला. स्वत:च्या लेखनातून ब्रिटिशांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा बाणेदारपणा दाखवला.

दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचा विधानभवनाच्या परिसरात पूर्णाकृती पुतळा उभारण्याची विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांची मागणी !

दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या कार्याचे स्मरण भावी पिढीला व्हावे, यासाठी विधानभवनाच्या परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांकडून करण्यात आली आहे.

‘पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे !’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे धाडस भाजपच्या राज्यात होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारचा धर्मांध आणि समाजकंटक यांच्यावर वचक असला पाहिजे !

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपावर एस्.टी. कर्मचारी संघटना आणि शासन यांनी समन्वयातून मार्ग काढावा ! – ग्राहक पंचायतीची मागणी

सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात् एस्.टी.च्या  कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन चालू होऊन अनेक दिवस झाले. या संपामुळे नोकरदार, विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्य जनतेची असुविधा होत आहे.