इटलीमध्ये ५ सहस्रहून अधिक वैद्यकीय कर्मचारी कोरोना ‘पॉझिटिव्ह’

इटलीमध्ये आतापर्यंत ५ सहस्रहून अधिक डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, रुग्णवाहिका कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

‘घराबाहेर पडू नको’ असे सांगूनही न ऐकल्याने भावाची हत्या

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘दळणवळण बंदी’चे प्रकरण
आपत्काळात किती संयमाने वागणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून लक्षात येईल !

देहलीतील ‘मोहल्ला क्लिनिक’चा डॉक्टर, त्याची पत्नी आणि मुलगी यांना कोरोनाची लागण

येथील मौजपूरमधील ‘मोहल्ला क्लिनिक’च्या (देहली सरकारकडून चालवण्यात येणारे लहान चिकित्सालय) एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ८०० जणांना विलगीकरण (क्वारंटाईन) करण्यात आले आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी अमेरिकेत तंबू आणि ट्रक यांमध्ये वातानुकूलित शवागार बनवण्याची सिद्धता

कोरोनामुळे अमेरिकेत प्रतिदिन रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. न्यूयॉर्क शहरात ३० सहस्रांहून अधिक जणांना याची बाधा झाली आहे.

‘कोरोना’च्या भीतीने आधुनिक वैद्य आणि रुग्णालयातील कर्मचारी यांना घरमालकांकडून घर रिकामे करण्यासाठी तगादा

देशभरात थैमान घालणार्‍या कोरोना विषाणूपासून जनतेचे रक्षण करण्यासाठी आधुनिक वैद्य आणि पोलीस यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत………

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘नाशिक रस्ता मध्यवर्ती कारागृहा’तील ५७ बंदीवानांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘नाशिक रस्ता मध्यवर्ती कारागृहा’तील छोट्या गुन्ह्यांतील ५७ बंदीवानांना वैयक्तिक जातमुचलक्यावर गेल्या ३ दिवसांत सोडण्यात आले…

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची अफवा पसरवणार्‍यास पोलिसांनी घेतले कह्यात

कोरोना विषाणूच्या संदर्भात ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ध्वनीमुद्रित क्लिप सिद्ध करून अफवा पसरवणार्‍या एका संशयित व्यक्तीस येथील पोलिसांनी २६ मार्च या दिवशी कह्यात घेतले आहे…

विविध घटकांसाठी १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ घोषित

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. या बंदीचा गरीबांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारकडून ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’च्या अंतर्गत १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांच्या ‘पॅकेज’ देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केली.

…अन्यथा दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश देईन ! – तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची चेतावणी

जनता आपत्काळात दिलेल्या सूचना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे अशी चेतावणी द्यावी लागते, हे जनतेला लज्जास्पद ! या संकटावर मात करण्यासाठी शासकीय आदेशांचे पालन करणे अपरिहार्य आहे.

पाकमध्ये जूनपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या २ कोटींपर्यंत पोचण्याची शक्यता ! – दैनिक ‘द डॉन’

पाकिस्तान येथील दैनिक ‘द डॉन’ने माहिती विश्‍लेषक ओसामा रिझवी आणि अहसान जाहिद यांनी माहिती विश्‍लेषक टॉमस प्यूओ यांच्या साहाय्याने एक अहवाल सिद्ध केला आहे. त्यानुसार पाकिस्तानने कोरोनाला आळा न घातल्यास जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २ कोटींपर्यंत पोचेल !