३० जणांचा मृत्यू
रोम – इटलीमध्ये आतापर्यंत ५ सहस्रहून अधिक डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, रुग्णवाहिका कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. प्रारंभीच्या काळात येथे डॉक्टरांकडे पुरेशी संरक्षक उपकरणे नव्हती. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढू लागला. प्रारंभी रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय तंत्रज्ञ यांना रुग्णांपासून होणार्या संसर्गाचा बचाव करण्यासाठी त्यांना विलगीकरण करून उपचार देणे आवश्यक होते; पण परिणामांकडे दुर्लक्ष केल्याने आपात्कालीन परिस्थितीतील ३० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.