‘कोरोना’च्या भीतीने आधुनिक वैद्य आणि रुग्णालयातील कर्मचारी यांना घरमालकांकडून घर रिकामे करण्यासाठी तगादा

बुलडाणा – देशभरात थैमान घालणार्‍या कोरोना विषाणूपासून जनतेचे रक्षण करण्यासाठी आधुनिक वैद्य आणि पोलीस यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत; मात्र असे असतांना रुग्णालयात सेवा बजावणारे आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्यामुळे आम्हालाही कोरोना होईल, या धास्तीने घरमालकांनी त्यांच्या येथे भाड्याने रहाणारे आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांना ‘घर रिकामे करा’, असे सांगितले जात आहे. खामगाव शहरातील सिल्व्हर सिटी सर्वोपचार रुग्णालयात काम करणार्‍या आधुनिक वैद्यांसमवेत हा प्रकार घडला आहे.