दत्ताला करावयाच्या प्रार्थना !
हे दत्तात्रेया, तू जसे २४ गुणगुरु केलेस, तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !
हे दत्तात्रेया, तू जसे २४ गुणगुरु केलेस, तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !
आत्मानंदाकडे घेऊन जाणारा ॐकार ज्याच्याविषयी बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रांतून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांचा सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडवणारा दत्त आहे.
दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्या शक्तीने नामजप करणार्याच्या भोवती संरक्षककवच निर्माण होते. बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत सर्वाधिक गुरफटलेले असतात. यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो.
‘श्री’ म्हणजे लक्ष्मी आणि ती ज्याच्या पायाशी आहे, तो ‘श्रीपाद’. ‘श्रीपाद वल्लभ’ म्हणजे लक्ष्मी त्याच्या पायाशी असून तो लक्ष्मीचा स्वामी आहे, असा (श्रीविष्णु). ‘सर्व रूपांच्या समुच्चयातून निर्माण झालेला….