ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची अनुमती द्या !

ज्ञानवापी परिसरात सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार मिळण्यासाठी श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती दलाचे अध्यक्ष राजेश मणी त्रिपाठी यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. श्रावण मास चालू होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली.

मनमानी आणि अविचाराने होणारी अटक, ही वसाहतवादी मानसिकता दर्शवते ! – सर्वोच्च न्यायालय

आरोपीच्या नियमित जामीन अर्जावर साधारतः २ आठवड्यांच्या आत आणि अंतरिम अर्जावर ६ आठवड्यांच्या आत निर्णय झाला पाहिजे. कुणालाही अटक करण्यापूर्वी भारतीय दंड सहितेच्या कलम ४१ आणि ‘४१ अ’चे पालन केले पाहिजे

न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी विजय माल्या याला ४ मासांच्या कारावासाची शिक्षा

विदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्या याला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी ४ मासांच्या कारावासाची, तसेच २ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

कुख्यात गुंड आबू सालेम याला २५ वर्षांच्या शिक्षेनंतर सोडावे लागेल ! – सर्वोच्च न्यायालय

मुंबईमध्ये वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणात कुख्यात गुंड आबू सालेम याला दोषी ठरवण्यात आले आहे. कारागृहाची शिक्षा भोगल्यानंतर पोर्तुगालला दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठी केंद्र सरकारला त्याला मुक्त करावे लागेल’, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले.

महाराष्ट्रात विधानसभेच्या आमदारांच्या अपात्रेचा निर्णय अध्यक्षांनी घेऊ नये ! – सर्वोच्च न्यायालय

विधानसभेतील आमदारांच्या अपात्रतेविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश ११ जुलै या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या अध्यक्षांना दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची माहिती सर्वाेच्च न्यायालयात सादर ! – राज्य निवडणूक आयोग

राज्यात होणार्‍या ग्रामपंचायत, नगर परिषद आणि नगर पंचायत यांच्या निवडणुकीची सविस्तर माहिती राज्य निवडणूक आयोगाने ८ जुलै या दिवशी सर्वाेच्च न्यायालयात सादर केली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या एका अधिकार्‍यांनी दिली.

एकटी मुसलमान महिला अल्पवयीन मुलांची पालक होऊ शकत नाही ! – केरळ उच्च न्यायालय

केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय देतांना एकटी मुसलमान महिला तिचे अल्पवयीन मूल आणि तिची संपत्ती यांची पालक होऊ शकत नाही; कारण यापूर्वीच अशा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी स्वाक्षरी अभियान !

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक माध्यमांतून स्वाक्षरी अभियान राबण्यात येत आहे

सर्वोच्च न्यायालयाने लक्ष्मणरेषा ओलांडली !

देशभरातील न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी आणि सैन्याधिकारी अशा ११७ जणांचे मत
सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या नूपुर शर्मा यांना फटकारल्याचे प्रकरण

सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांवर माझा आक्षेप असला, तरी मला त्यावर भाष्य करायचे नाही ! – कायदामंत्री रिजिजू

‘कायदामंत्री’ या नात्याने सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय किंवा त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. त्यावर (माझा) आक्षेप असला, तरी मला त्यावर भाष्य करायचे नाही.