सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांवर माझा आक्षेप असला, तरी मला त्यावर भाष्य करायचे नाही ! – कायदामंत्री रिजिजू

नूपुर शर्मा यांच्या संदर्भात सर्वाेच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणांचे प्रकरण

केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू

नवी देहली – भाजपच्या तत्कालीन राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून सर्वाेच्च न्यायालयाने शर्मा यांना फटकारले. यावर केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, ‘कायदामंत्री’ या नात्याने सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय किंवा त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. जरी मला निर्णय आवडला नसला आणि ज्याप्रकारे निरीक्षणे नोंदवण्यात आली, त्यावर (माझा) आक्षेप असला, तरी मला त्यावर भाष्य करायचे नाही, असेही रिजिजू म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी योग्य ठिकाणी यावर चर्चा करीन. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले असून तो निर्णयाचा भाग नाही.