प्रभाग क्रमांक १६ मधील रेवणी रस्त्यावरील फायर स्टेशनच्या जागेवरच नवीन अत्याधुनिक फायर स्टेशन बांधा !
फायर स्टेशन आयुक्तांच्या आदेशाने स्टेशन चौक येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. या जागेवर प्रशासन काय करणार आहे ?
फायर स्टेशन आयुक्तांच्या आदेशाने स्टेशन चौक येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. या जागेवर प्रशासन काय करणार आहे ?
बेळगाव जिल्ह्यात ४७७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २५९ ग्रामपंचायतींची, तसेच दुसर्या टप्प्यात २१८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साहित्य संस्थांना शासनाकडून देण्यात येणारे अनुदान कमी करण्यात आले आहे. अनुदानाच्या तुटपुंज्या रकमेवर साहित्य संस्था कशा चालवायच्या ?, असा प्रश्न संस्थाचालकांनी उपस्थित केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु राष्ट्रसंत श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. काही समाजविघातक शक्तींकडून हे शिल्प हटवण्यासाठी शासकीय अधिकार्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पंढरपूर-पुणे पालखी महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग करण्याचे काम चालू आहे. हे काम करतांना वाखरी-भंडीशेगाव दरम्यान असलेल्या बाजीराव विहिरीचा अडथळा येत असल्याने ती बुजवण्याचे काम चालू होते. ही विहीर ऐतिहासिक असल्याने ती बुजवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला.
कनिष्ठ न्यायालयातील निकालाला सत्र न्यायालयात दाद मागतांना इंदुरीकर महाराज यांच्या वतीने सादर करण्यात आलेली कागदपत्रे अपूर्ण होती. ती पुराव्यांची संपूर्ण कागदपत्रे प्रमाणित करून घेऊन सत्र न्यायालयात सादर करावीत, असा आदेश न्यायालयाने त्यांच्या अधिवक्त्यांना दिल्यामुळे त्यांच्यासंबंधीच्या खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली.
पालकांनी केवळ निषेध नोंदवून न थांबता मनमानी कारभार करणार्या शाळा प्रशासनाला चूक दुरुस्त करायला लावणे अपेक्षित आहे.
तुम्ही मते देऊन नेत्यांना विकत घेत नाही, अशा शब्दांत येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यापार्यांना फटकारले. येथील न्यू मार्केट परिसरामधील एका इमारतीच्या भूमीपूजनच्या कार्यक्रमाच्या वेळी त्या बोलत होत्या.
३१ डिसेंबरपर्यंत फलक हटवला नाही, तर आम्ही पुन्हा शिर्डीत येऊन आंदोलन करू. त्या वेळी आम्ही शिर्डी संस्थानला ‘तालिबानी पुरस्कार’ देऊन सत्कार करू आणि त्यांच्या निर्णयाचा निषेध करू, अशी वल्गना तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.
हिंदु धर्माचा उल्लेख करून त्यामध्ये अन्य कुणाला समभाग अपेक्षित आहे, याची टीपही अर्जात देता आली असती. तसे न करता बहुसंख्य हिंदु धर्माला डावलून त्याऐवजी ‘नॉन मायनॉरिटी’ असा हेतुपुरस्सर उल्लेख करणाऱ्यांचा हिंदुद्वेष यातून उघड होत आहे.