बेळगाव जिल्ह्यात ४७७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार

बेळगाव – बेळगाव जिल्ह्यात ४७७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २५९ ग्रामपंचायतींची, तसेच दुसर्‍या टप्प्यात २१८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात २२ डिसेंबरला बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तुर, गोकाक आणि मुडलगी तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी, तर दुसर्‍या टप्प्यात सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड आणि रायबाग तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात होणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ११ डिसेंबर हा उमेदवारी आवेदन भरण्याचा शेवटचा दिवस आहे. २२ डिसेंबरला पहिल्या टप्प्याचे मतदान होईल आणि ३० डिसेंबरला मतमोजणी होईल. दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी आवेदन भरण्यासाठी १६ डिसेंबर हा अंतिम दिनांक आहे. २७ डिसेंबरला दुसर्‍या टप्प्याचे मतदान होईल आणि ३० डिसेंबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीत नोटा पर्याय देण्यात आलेला नाही.