बीड जिल्ह्यात २ दिवसांत २६ कावळ्यांचा मृत्यू

देशातील ६ राज्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट होत असतांना पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे २ दिवसांत २६ कावळे मृतावस्थेत आढळले आहेत.

अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे

मार्च मासाच्या अखेरीस नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी संभाजीनगरमध्ये ८ जानेवारी या दिवशी केली.

पेण बलात्कार प्रकरणाचा खटला अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी लढवावा – मनसे

पेण शहरातील आदिवासी पाड्यात रहाणार्‍या ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍यात आली. या बलात्कार प्रकरणाचा खटला अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी लढवावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

शनिशिंगणापूर येथील शनैश्‍वर देवस्थानचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड

नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्त पदावर अध्यक्षपदी भागवत सोपान बानकर आणि उपाध्यक्षपदी विकास नानासाहेब बानकर यांची निवड करण्यात आली आहे.

१ लाख ८५ सहस्र रुपयांची बनावट कृषी औषधे जप्त

विवेकानंद कॉम्प्लेक्समधील बोढे कृषी केंद्रातून १ लाख ८५ सहस्र रुपयांची बनावट कृषी औषधे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी पोलिसांच्या साहाय्याने जप्त केली.

बंगालमध्ये कोरोनावरील लस सर्वांना विनामूल्य देणार ! – मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांची घोषणा

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘राज्यातील सर्व गरजू नागरिकांना कोरोनावरील लस विनामूल्य देण्यात येईल’, अशी घोषणा केली आहे.

औरंगाबादच्या नामांतराची भूमिका शिवसेनेची, सरकारची नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करण्याची शिवसेनेची भूमिका आहे; मात्र काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याला विरोध दर्शवला आहे.

चराठा (सावंतवाडी) गावच्या श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव

पूर्वी चराठा हे गाव ‘मौजे चराठिये’ या नावाने ओळखले जायचे. गावच्या श्री सातेरीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्बादशी, कलियुग वर्ष ५१२२ (१० जानेवारी २०२१) या दिवशी साजरा होत आहे.

एका आठवड्यात सर्वांसाठी लोकल रेल्वे चालू होणार ! 

रेल्वे चालू करण्याने कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून उपाययोजना करण्यात येईल

नांदेड येथे शंकर नागरी सहकारी बँकेत १४ कोटी रुपयांचा ऑनलाईन दरोडा ! 

आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक रूपेश कोडगिरे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.