राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात शिवजयंती ‘स्वराज्यदिन’ म्हणून साजरी करण्यात येईल !

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

शिवजयंती कार्यक्रमात बोलताना उदय सामंत उजवीकडे

पुणे – माझ्या अखत्यारीत येणार्‍या महाविद्यालयांत पुढील वर्षापासून शिवजयंती ही प्रत्येक महाविद्यालयात ‘स्वराज्यदिन’ म्हणून साजरी केली जाईल. याविषयीचा आदेश काढला जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी येथे केली. शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने पुण्यातील लालमहाल येथील जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या वेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांसह शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.