राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन !

शहरात विविध संघटनांच्या वतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले.

राज्यपाल निधीतून पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे साहाय्य ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

८ जानेवारी या दिवशी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून १० निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना राज्यपाल निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांचे साहाय्य देण्याची घोषणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.

‘बर्ड फ्लू’च्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेचे आवाहन

बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने मुंबईत पक्ष्यांचे मृत्यू झाल्यास पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या १९१६ या साहाय्य क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

शेळ-मेळावली येथील आय.आय.टी. प्रकल्प रहित करा ! – विश्‍वजित राणे

आरोग्यमंत्री आणि सत्तरी तालुक्याचे आमदार विश्‍वजित राणे यांनी शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाला असलेला त्यांचा पाठिंबा काढून हा प्रकल्प रहित करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

‘बर्ड फ्ल्यू’मुळे मुरुंबा (जिल्हा परभणी) गावात संचारबंदी लागू

मुरुंबा गावात ‘बर्ड फ्ल्यू’मुळे अनुमाने ८०० कोंबड्यांच्या मृत्यू झाला. गेल्या २ दिवसांत पुन्हा याच परिसरातील अन्य कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. हा आजार पसरू नये; म्हणून जिल्हा प्रशासनाने या गावात संचारबंदी लागू केली आहे.

राज्यातील अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांचे लाक्षणिक उपोषण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांतील अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करणे, तसेच सातवा वेतन आयोग लागू करणे या मुख्य मागण्यांसाठी ११ जानेवारी या दिवशी सकाळपासून राज्यभरातील वैद्यकीय अधिकारी संपावर गेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात महिलेकडून अत्याचार केल्याचा आरोप 

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप

आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाका आंदोलनाच्या गुन्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह १७ जण निर्दोष मुक्त

या वेळी जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे आंदोलकांकडून उल्लंघन झाले होते. यामुळे पोलिसांनी आमदार भोसले आणि समर्थकांवर गुन्हा नोंद केला होता.

पवई (मुंबई) येथे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसाला मारहाण

आमदार राम कदम यांनी आरोपींना सोडण्याची विनंती केल्यामुळे टीका