महाराष्ट्राचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची एन्.सी.बी.कडून चौकशी

या प्रकरणाची सरकारने तात्काळ नि:पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !

भाजपचे उपमहापौर राजेश काळे पक्षातून बडतर्फ

उपमहापौर राजेश काळे यांना भाजप पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. राजेश काळे यांच्यावर महापालिका आयुक्त आणि उपायुक्त यांना खंडणीसाठी धमकावणे, शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, असे आरोप उपायुक्त धनराज पांडे यांनी दिलेल्या तक्रारीत करण्यात आले होेते.

प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित केल्याचे शासनाने लेखी आश्‍वासन द्यावे ! – मेळावली ग्रामस्थ

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित केल्याचे शासनाने लेखी आश्‍वासन द्यावे. ग्रामस्थांना शासनाचे तोंडी आश्‍वासन नको, तसेच शासनाने ग्रामस्थांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या सर्व तक्रारी मागे घ्याव्यात, अशी मागणी शेळ-मेळावली ग्रामस्थांनी केली आहे.

रेखा जरे हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा !

येथील ‘यशस्विनी ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्याप पसार असून त्याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. तरीही तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. यामुळे तपास रेंगाळला असून संशयाला वाव मिळत आहे.

स्वतंत्र ग्रामपंचायत मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील १२ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार !

१२ गावांतील गावकर्‍यांनी वारंवार मागणी करूनही स्वतंत्र ग्रामपंचायत सिद्ध न करणे हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे.

सोलापूर येथील सिद्धेश्‍वर यात्रेतील अक्षता सोहळा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने

या सोहळ्यानिमित्त सम्मती कट्टा परिसर फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. या वेळी पालखीचे पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा या वर्षी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आणि शासनाच्या नियमांचे पालन करत पार पडला.

सोलापूर येथे नंदीध्वजाचे पूजन करून सिद्धेश्‍वर यात्रेस प्रारंभ

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या यात्रेस १२ जानेवारी या दिवशी मोठ्या उत्साहात तैलाभिषेकाने प्रारंभ करण्यात आला. प्रशासनाच्या आदेशानुसार मोजक्याच मानकर्‍यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन !

शहरात विविध संघटनांच्या वतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले.

राज्यपाल निधीतून पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे साहाय्य ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

८ जानेवारी या दिवशी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून १० निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना राज्यपाल निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांचे साहाय्य देण्याची घोषणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.