चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल करू नये ! – शिवसेनेचा पत्रकाच्या माध्यमातून आरोप 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरून त्यांची दिशाभूल करू नये. गेली ७० वर्षे बहुतांशी ब्राह्मण समाज भारतीय जनता पक्षाच्या मागे उभा होता; मात्र सातत्याने खोटे बोलून समाजाला फसवण्याच्या पलीकडे त्यांना काहीही दिले नाही. त्यामुळे अस्वस्थ समाज शिवसेनेकडे वळत असल्याचे शिवसेनेने पत्रकात म्हटले आहे. मागच्या सरकारने ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य व्हावी म्हणून अमृत नावाने महामंडळ प्रस्थापित केले होते; मात्र महाविकास आघाडीचे सरकार आले आणि हा प्रस्ताव बारगळला अशी खोटी माहिती चंद्रकांत पाटील ब्राह्मण समाजाच्या व्यक्तींना भेटून पसरवत आहेत, असा आरोप शिवसेनेने पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.