कोरोनासह इतर विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी देशातील पहिल्या ‘विषाणू रक्षक’ आयसोलेशन चेंबर्सची निर्मिती

फ्रान्स, जर्मनी या देशांत अशा प्रकारच्या चेंबर्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्याचे मूल्य या देशात अनुमाने १८ लाख रुपयांपर्यंत आहे. आपल्या आधुनिक वैद्यांनी हा विषाणू रक्षक चेंबर ३ लाख रुपयांमध्ये सिद्ध केला आहे.

यंदा मुंबईसह कोकणात तीव्र उन्हाळा ! – हवामान खाते

राजस्थान आणि गुजरात येथून उष्ण वारे मध्य भारताकडे वहात आहेत. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील तापमानातही वृद्धी झाली आहे. अकोला आणि चंद्रपूर येथे उष्णतेची चेतावणी (‘हिट अलर्ट’) देण्यात आली आहे.

मुंबईतील एका उपाहारगृहातील १० कर्मचारी कोरोनाबाधित 

गेल्या मासापासून मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात प्रश्‍नसंच सिद्ध करण्याच्या कामासाठी प्राध्यापकांची टाळाटाळ !

प्रश्‍नसंच काढण्याच्या कामात टाळाटाळ करणार्‍या प्राध्यापकांवर कारवाईचा प्रस्ताव परीक्षा प्रमाण मंडळापुढे सादर केला जाईल, असे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील स्थूल उत्पन्नात १ लाख ५६ सहस्र ९२५ कोटी रुपयांची घट !

५ मार्च या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पटलासमोर महाराष्ट्राचा आर्थिक पहाणी अहवाल मांडण्यात आला.

४ वेळा नर्मदा परिक्रमा केलेले लेखक जगन्नाथ कुंटे यांचे निधन !

लेखक जगन्नाथ केशव कुंटे उपाख्य स्वामी अवधूतानंद यांचे ४ मार्च या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, मुलगी आणि जावई असा परिवार आहे.

परळी (बीड) येथील वैद्यनाथ महाशिवरात्री महोत्सव रहित !

कोरोनाच्या संसर्गामुळे येथील बारा ज्योतिर्लिंगांतील एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री महोत्सव रहित करण्यात आला असून ८ ते १६ मार्च या कालावधीत वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातील सर्व शिवालये भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत.

देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी नंदुरबार येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

देहली आणि केरळ यांसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी, तसेच दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून सखोल अन्वेषण केले जावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने भारताचे केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.

मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा त्यांचे भाऊ विनोद यांचा दावा !

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्याचे मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च या दिवशी संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावरील अवमानकारक पोस्टप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर कारवाई करावी ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

आरोप करणार्‍या पुण्यातील व्यक्तीला अटक