मुंबई – अंधेरीतील राधाकृष्ण उपाहारगृहामधील १० कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारांसाठी बीकेसी येथील कोविड केंद्रामध्ये भरती करण्यात आले आहे.
गेल्या मासापासून मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. महापालिकेच्या अधिकार्यांनी ही माहिती दिली.
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ मार्च या दिवशी २१ लाख ८८ सहस्र १८३ झाली असून बळींचा आकडा ५२ सहस्र ३४० आहे. सध्या ८५ सहस्र १४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.