सुसंस्कृत कुटुंबाची पार्श्वभूमी सांगून आरोप तात्काळ फेटाळले !

मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – नीतेश राणे यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि खोटे आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. नीतेश राणे यांनी केलेल्या आरोपांविषयी मी त्यांना कायदेशीर नोटीस देणार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी १५ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. ‘आय्.पी.एल्.’ स्पर्धेत बेटिंगवाल्यांकडून हप्त्याचा वाटा मिळावा, यासाठी वरूण सरदेसाई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या संपर्कात होते, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला होता. यावर वरुण सरदेसाई यांनी उत्तर दिले.
या वेळी वरुण सरदेसाई म्हणाले, ‘‘नीतेश राणे यांनी केलेल्या आरोपांचा माझ्या राजकीय कारकीर्दीला त्रास होऊ शकतो. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपाविषयी त्यांच्याकडे कोणते पुरावे असल्यास त्यांनी ते कोणत्याही अन्वेषण यंत्रणेकडे अन्वेषणासाठी द्यावेत.’’
या वेळी शिवसेनेचे नेते अनित परब म्हणाले, ‘‘जो आरोप करतो, त्यांच्यावर ते आरोप सिद्ध करण्याचे दायित्व असते. नीतेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर केलेले आरोप सिद्ध करावेत.’’
चंद्रपूर येथील ‘कॅन्सर रुग्णालया’वर सायबर आक्रमण !
वरळी डोम येथील पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमात तरुणाचा मृत्यू !
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
शिरगाव येथे उपेंद्र गावकर आणि त्यांच्या कुटुंबावर गोळीबार
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी